Ashadhi Ekadashi Wari 2023

Ashadhi Ekadashi Wari 2023: आषाढी एकादशी निमित्त पुणे सातारा सोलापूर या जिल्ह्यातून जाणाऱ्या
मार्गक्रमण करणाऱ्या विविध संतांच्या पालख्यांबरोबर असणाऱ्या वारकरी भाविकांना स्वच्छता आणि
सुविधा पुरवण्यासाठी
मुक्कामाच्या ठिकाणी तात्पुरत्या शौचालयांची व्यवस्था करण्याच्या कामांसाठी 21 कोटी रुपये
मंजुरी देण्यात आली असल्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले आहे.
महाजन म्हणाले की आषाढी एकादशीच्या निमित्ताने
लाखो वारकरी दरवर्षी पायी चालत पंढरपूरला जात असतात. विविध दिंड्यांचा ही सहभाग यामध्ये असतो .Ashadhi Ekadashi Wari 2023 पालखी सोहळ्यात खूप ठिकाणी मुक्काम केले जातात. या मुक्कामाच्या ठिकाणी वारकऱ्यांना शासनाच्या वतीने
सोयी सुविधा मिळावा यासाठी ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून ही तरतूद करण्यात आली आहे

Ashadi Wari News

Ashadi Wari News

.पालखी सोहळ्यातील संत ज्ञानेश्वर महाराज ,संत तुकाराम महाराज, संत सोपान काका महाराज या प्रमुख पालकांचा
प्रवास जवळपास 22 दिवसांपेक्षा जास्त दिवसांचा असतो .त्यामुळे वारकऱ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध
करून देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले आहे .
“आषाढी एकादशी निमित्त पुणे सातारा
सोलापूर या जिल्ह्यातून मार्गक्रमण करणाऱ्या विविध संतांच्या पालख्यान सोबतच्या भाविकांना स्वच्छता सुविधा पुरविण्यासाठी
मुक्कामाच्या ठिकाणी तात्पुरत्या सौचालयांच्या उभारणीसाठी 21 कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी दिली”,
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी ट्विटर ट्विट केले आहे. ग्रामपंचायतींना निर्मलवारीसाठी चार कोटी 21 लाख रुपये
सोलापूर पुणे व सातारा जिल्ह्यांमध्ये पालखी मार्गातील ग्रामपंचायतींना निर्मल वारीसाठी चार कोटी 21 लाख रुपयांचा निधी देण्यात
आला आहे .यामध्ये वारी ज्या ग्रामपंचायतच्या हद्दीतून जाणार आहे. त्या ग्रामपंचायतीतील स्वच्छता राखणे व भाविकांना
सुविधा पुरवण्याची जबाबदारी ग्रामपंचायत वर असणार आहे .

Ashadhi Ekadashi News

Ashadhi Ekadashi News

पुणे जिल्हा परिषदेला 17 कोटी 64 लाख रुपये निधीस मान्यता. गिरीश महाजन म्हणाले की या निधीमधून संत
ज्ञानेश्वर माऊली, संत तुकोबाराय व संत सोपान देव या पालख्यांसोबत असणाऱ्या भाविकांसाठी तात्पुरत्या स्वरूपात
शौचालय निवारा व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात या देण्यात आले आहेत.
जिल्हा परिषद पुणे यांनी 2023 या चालू वर्षात आषाढी वारी निमित्त शासनात सादर केलेल्या 17 कोटी 64 लाख रुपये
इतक्या निधी प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे.

Nitin Gadkari:नितीन गडकरी डिझेल वाहनांच्या विक्रीवर 10% अतिरिक्त जीएसटी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *