Chandrayan 3:भारताच्या चांद्रयान-३ या मोहिमेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील अंतराळ केंद्रातून
१४ जुलै रोजी दुपारी २.३५ वाजता ‘चांद्रयान-३’Chandrayan 3 अंतराळात प्रक्षेपित केले जाईल. ६ सप्टेंबर २०१९ च्या पहाटे चंद्रावर लँडर व
रोव्हर आदळल्यानंतर चांद्रयान-२ मोहीम अंशत: अयशस्वी झाली होती. त्यामुळे भारताच्या चांद्रयान-३ मोहिमेला वेगळे
महत्त्व प्राप्त झाले आहे.
चांद्रयान-३ Chandrayan 3च्या लँडरने २३ किंवा २४ ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करणे अपेक्षित आहे. ६१५ कोटी
रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या चांद्रयान -३ या मोहिमेचे उद्दिष्ट हे रोव्हरला चंद्राच्या कक्षेमध्ये पोचवणे व चंद्राच्या
पृष्ठभागावर वैज्ञानिक प्रयोग करणे हे आहे.
अवकाशात गेल्यावर Chandrayaan-3 हे पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालायला सुरुवात करेल. प्रत्येक प्रदक्षिणा
घालतांना पृथ्वीपासूनचे अंतर वाढवले जाईल आणि एका त्यानंतर एका विशिष्ट अंतरावरुन ते चंद्राकडे रवाना होईल.
चंद्राच्या कक्षेत पोहचल्यावर काही दिवस चंद्राभोवती प्रदक्षिणा घातल्यावर मगच Chandrayaan-3 हे चंद्रावर उतरणार आहे.
चंद्रावर अलगद उतरल्यावर लँडरमधून रोव्हर हा प्रत्यक्ष चंद्राच्या जमिनीवर संचार करणार आहे. या मोहिमेतून चंद्राचा प्रत्यक्ष अभ्यास
केला जाणार आहे.
Chandrayaan-3 Launch: कुठे आणि कसे पाहता येणार ऑनलाईन ?
राष्ट्रीय अंतराळ संस्थेने नागरिकांना चांद्रयान-३ चे प्रक्षेपण पाहण्यासाठी आमंत्रित केले आहे. SDSC-SHAR, श्रीहरिकोटा येथील लॉन्च व्ह्यू गॅलरीतून पाहता येणार आहे. ISRO ने ट्विट करत नागरिकांना हे प्रक्षेपण पाहण्यासाठी आमंत्रित केले आहे.
राष्ट्रीय अंतराळ संस्थेने चांद्रयान-3 मोहिमेसाठी तीन मुख्य उद्दिष्टे स्थापित केली आहेत – चंद्रावर सुरक्षित लँडिंग,
चंद्राच्या पृष्ठभागावर फिरण्याची रोव्हरची क्षमता प्रदर्शित करणे आणि थेट साइटवर वैज्ञानिक निरीक्षणे घेणे.
यासह चांद्रयान -३ चे थेट प्रक्षेपण इस्रोच्या वेबसाईटवर, फेसबुक आणि युट्युबवर देखील पाहता येणार आहे.