Pune bharat Gaikwad Suicide: अमरावती पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP)
भरत गायकवाड यांनी पत्नीचा आणि पुतण्याचा गोळी झाडून खून केला. त्यानंतर त्यांनी स्वतःवरही गोळी
झाडून आत्महत्या (Bharat Gaikwad Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील
बाणेर (Baner) परिसरात मध्यरात्री 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.Pune Crime
मोनी गायकवाड (वय 44), पुतण्या दीपक गायकवाड (वय 35) अशी गोळी झाडून खून करण्यात आलेल्या
दोघांची नावं आहेत. तर भरत गायकवाड यांनी स्वतःवर गोळी झाडून स्वत:चं आयुष्य देखील संपवलं (Suicide) आहे.
या घटनेची माहिती मिळताच चतु:शृंगी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. भरत गायकवाड हे अमरावती
पोलीस दलात सहाय्यक पोलीस आयुक्त (Amravati ACP) म्हणून कार्यरत होते, तर त्यांचे कुटुंबीय
पुण्यात वास्तव्याला होते. ते सुट्टीसाठी नुकतेच पुण्यातल्या घरी आले होते.
PUNE CRIME
- चतु:शृंगी पोलीस या धक्कादायक घटनेचा तपास करत आहेत. नेमकी ही हत्या करण्याचं कारण काय? आणि त्यानंतर आत्महत्या करण्यामागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
- पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील बाणेर, बालेवाडी भागात गायकवाड कुटुंब
वास्तव्यास होते. पोलीस दलात वरिष्ठ पदावर काम करत असलेले आणि सध्या सुट्टीवर असलेले
भरत गायकवाड हे शनिवारीच पुण्यातील घरी आले होते. मात्र आज पहाटे त्यांनी आधी पत्नी मोनी गायकवाड
आणि नंतर पुतण्या दीपक गायकवाड यांची गोळी झाडून हत्या केली. ही घटना घडली तेव्हा एसीपी भरत गायकवाड यांची
आई आणि दोन मुलेही घरात होती. पहाटे गोळी झाडण्याचा आवाज ऐकताच त्यांनी खोलीकडे धाव घेतली. मात्र तोपर्यंत सगळं संपलं होतं. - हत्याकांडानंतर गायकवाड यांच्या घाबरलेल्या मुलांनी या घटनेबाबतची माहिती फोनद्वारे पोलिसांना
दिली. त्यानंतर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता
घरात सुसाईड नोट आढळून आलेली नाही. त्यामुळे या घटनेमागील कारणांचा शोध घेण्यासाठी पुढील
तपास करण्यात येत आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्याकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, पोलीस दलात सहाय्यक आयुक्तपदासारख्या वरिष्ठ पातळीवर काम करत असलेल्या अधिकाऱ्याने
दुहेरी हत्येनंतर स्वत:ही आत्महत्या केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. भरत गायकवाड यांनी पत्नी
आणि पुतण्याची हत्या करून आत्महत्या का केली, याबाबत पोलीस तपासात नेमकी काय माहिती समोर येते,
हे पाहावं लागेल.
Balasaheb Thackeray’s son?’:भाजपने उद्धव ठाकरेंच्या गोध्रा टीकेवर टीका केली.
Nitin Gadkari:नितीन गडकरी डिझेल वाहनांच्या विक्रीवर 10% अतिरिक्त जीएसटी