भारतीय रिझर्व बँकेने Withdrawal of 2000 Rupee Noteचलनातून बंद केल्यानंतर काही दिवसांमध्येच नोटा बँकेत भरण्याची
मुदत जाहीर झाली आहे. बँकेच्या ग्राहकांना दोन हजाराच्या नोटा बँकेत भरण्यासाठी किंवा बदलून घेण्यासाठी 30 सप्टेंबर
ही अंतिम तारीख दिली आहे. या संदर्भात विरोधकांकडून जोरदार टीका केली जात असून याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात
याचिका दाखल करण्यात आहे. मात्र काही बँकांनी दोन हजार रुपयांची नोट बदलण्यासाठी किंवा खात्यात जमा करण्यासाठी
मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. तुमचे बँक खाते या बँक मध्ये असतील तर ही महत्त्वाची अपडेट तुमच्यासाठी आहे
पुढील गोष्टी जरूर वाचा.
Withdrawal of 2000 Rupee Note
२०,००० रुपये किंवा जास्तीत जास्त दोन हजारांच्या १० नोटांची मर्यादा रिझर्व्ह बँकेने निश्चित केली आहे. एक व्यक्ती
एका दिवसात जास्तीत जास्त २० हजार किंवा दोन हजारांच्या १० नोटा बदलू शकते. RBIच्या मार्गदर्शक सूचनांनंतर , ICICI PNB,SBI, HDFC सारख्या मोठ्या बँकांनीही याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. देशातील या प्रमुख बँकांमध्ये २०००
रुपयांच्या नोटा बदलणे किंवा जमा करण्याच्या प्रक्रियेबद्दल जाणून घ्या…
देशातील सर्वात मोठी बँक SBI कडून सांगण्यात आले की, कोणतीही व्यक्ती कोणताही फॉर्म किंवा स्लिप न भरता
२०,००० रुपयांपर्यंतच्या नोटा बदलू शकते, यासाठी कोणतेही ओळखपत्र दाखवावे लागणार नाही.
HDFC बँकेने काय मार्गदर्शन सूचना जारी केल्या?
HDFC बँकेने जारी केलेल्या नोटिशीनुसार, कोणतीही व्यक्ती ३० सप्टेंबरपर्यंत कोणत्याही शाखेत २००० रुपयांच्या नोटा
जमा करू शकते. त्याचबरोबर २०,००० रुपयांपर्यंतच्या नोटा एकावेळी बदलता येतील.
PNB बँकेने काय सांगितले आहे?
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेमध्ये समाविष्ट असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने (PNB) सांगितले आहे की,
कोणतेही ओळखपत्र न मागता आणि बँकेत फॉर्म भरल्याशिवाय २००० रुपयांच्या नोटा २०,००० च्या मर्यादेपर्यंत बदलल्या जातील.
ICICI बँकेकडून काय सांगण्यात आले आहे?
ICICI बँकेकडून सांगण्यात आले की, ग्राहक बँकेच्या कोणत्याही शाखेत किंवा कॅश डिपॉझिट मशीनला भेट देऊन
२००० रुपयांच्या नोटा जमा करू शकतात. २००० रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी बँकेकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.