Work From Home Vs Office : अचानक बहुतेक जण घरून ऑफिसचं काम करायला लागले, मग कोरोना मागे पडला.
ऑफिसेस पुन्हा सुरू झाली पण सगळेच याबद्दल खुश नाहीयेत आणि बंद झाल्यानंतर नोकरीत सोडली.
कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी टीसीएस(TCS) चा वार्षिक अहवालात कंपनीचे
मुख्य एच आर(HR) मिलिंद लक्कड यांनी म्हटलं होतं,
Work From Home Vs Officeकी कंपनीने वर्क फ्रॉम होम चा पर्याय थांबवण्याचा निर्णय घेतला पासून
अनेक महिला कर्मचाऱ्यांनी राजीनामे दिलेत. ते म्हणालेत, मला वाटतं कोरोना काळात
अनेक महिलांनी घरच्या परिस्थितीनुसार स्वतःची कामाची
पद्धत जुळून घेतली. त्यामुळे आता त्यांना ऑफिस मधून काम करण्याची इच्छा नाही आहे
.
Work From Home
वर्क फ्रॉम होम मुळे महिलांच्या आयुष्यात नेमकं काय बदललं ?
अनेकांना पुरुष आणि महिला अशा दोघांनाही कामात एका प्रकारचे लवचिकता दिली. प्रवासातला वेळ वाचत होता.
घरच्यांना वेळ देता येत होता. घरची आणि सोबत ऑफिसची कामही होत होती. अर्थात त्यातही संतुलन
साधण्याच्या अडचणी होत्याच त्यामुळे 2021 च्या उत्तरार्धात जेव्हा लॉकडाऊन जाऊन सगळ्या कचऱ्यात सुरू झाल्या.
तेव्हा लोकांना कामावर जाणं अवघड वाटू लागलं किंवा हायब्रीड वर्किंगचे पर्याय असतील. या काळाला द ग्रेट रेसिग्नेशन असंही म्हटलं ,
काम करणाऱ्या शर्मिला यांच्यासाठी दररोज ऑफिसला जाणार अवघड आहे. जसं यातून दोन दिवस ऑफिसला जायचं असेल तर ठीक आहे.
खरंतर ऑफिसला जात राहणं तुमच्या परफॉर्मिंग साठी ही आवश्यक आहे. तुमच्या वैयक्तिक वाढीसाठी सुद्धा हे
महत्त्वाचं आहे. कारण लोकांसोबत काम करताना तुम्ही नवनवीन गोष्टी शिकतात असं त्या सांगतात. अनेक कंपन्या आजकाल
हायब्रीड मॉडेल वर काम करतायेत म्हणजे गरज पडेल तेव्हाच किंवा काही ठराविक दिवसांना कर्मचाऱ्यांना ऑफिसला यायला सांगायचं
आणि कर्मचाऱ्यांनी यालाही पसंती दर्शवली आहे. कारण यात तुम्ही घर ऑफिस आणि मुलं यांच्यातला समतोल राहू शकतात.
ज्येष्ठ पत्रकार सुषमा रामचंद्रन यांच्या मते “महिलांना सर्व कामावरूनच करायला आवडतात हा गैरसमज आहे .
कारण प्रत्येक च काम घरून करणे शक्य नाही. जिथे घर लहान असतात .तिथे झूम मीटिंग करताना अडचणी येतात.
मागे मुलांचा गोंधळ असतो किंवा घरी दुसरी काही कामे सुरू असतात .त्यामुळे एकाग्रतेने काम होत नाही .
त्यामुळे एकाग्रतेने काम होत नाही “
असं त्या सांगतात .
वर्क फ्रॉम होम चा पर्याय संपत चालल्याने महिला राजीनामे देण्याचा विचार करत आहेत. याची दोन प्रमुख कारणे-
घराकडे मुलांकडे दुर्लक्ष होण्याची भीती आणि जाणे येण्याची सोय आणि प्रवासाची अडचण, अनेक वेळा
पुरुषां एवढ्याच सुलभतेने प्रवास महिला करू शकत नाहीत.
Work From Home Vs Office
हेही एक कारण जाणकार पुढे करतात आणि यामुळे महिलांचा वर्क फोर्स मधला टक्का कमी होत असेल
तर त्याचा फटका अर्थव्यवस्थेला कसा बसू शकतो. भारतीय उद्योग महासंघ अर्थात CIIच्या आकडेवारीनुसार,
भारतात सुमारे 43.2 कोटी महिला काम करण्याच्या वयोगटात आहेत. यापैकी सुमारे 34 पूर्णांक तीन कोटी
महिला असंघटित क्षेत्रात काम करतात. ज्यांचे एकूण जीडीपी मध्ये १८ टक्के योगदान आहे .
वर्क फोर्स मध्ये महिलांचा वाटा फक्त 24 टक्के आहे .तुलनेने चीनमध्ये हा आकडा 61 टक्के आहे.
कामाच्या ठिकाणी महिलांचा टक्का तसेच लैंगिक समानता वाढवण्यासाठी खाजगी तसेच सरकपातळीवर अनेक धोरण आखली जात आहेत.
गेल्या काही वर्षांमध्ये महिलांचा घसरता टक्का आणि आत्ताचा हा ट्रेंड चिंताजनक आहे. अशात करावं तरी काय? द क्वांटम हब चे सह संशोधन प्रमुख रोहित कुमार हे सांगतात की, कंपन्यांना हायब्रीड मॉडेलचाच विचार भविष्यात
करावा लागेल. जिथे कर्मचाऱ्यांना दररोज नाही तर आवश्यकतेनुसार ऑफिसला बोलवता येईल.
आणखी एक मुद्दा म्हणजे घरचे जबाबदारी-
आंबेडकर विद्यापीठाच्या असिस्टंट प्रोफेसर आणि अर्थशास्त्रज्ञ दीपा सिन्हा सांगतात की, पारंपरिक विचार हाच आहे
की घरची काम महिलांची जबाबदारी असते ही धारणा बदलण्याची गरज आहे त्यासाठी माणसांनी सुद्धा घरातील
काम वाटून घेतली पाहिजे असं त्यांना वाटतं. तुम्हाला काय जास्त आवडतात? घरून कामे की ऑफिसमध्ये जाऊन कामे नक्की सांगा .