NCP on shahrukh khan: बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खान नव्या संसदेच्या इमारत समर्थनार्थ ट्विट केल्यानंतर
राष्ट्रवादी काँग्रेसने त्यावर प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्रातील भाजप नेते आता शाहरुखच्या चित्रपटावर बंदी आणण्याची
मागणी करणार नाहीत असा टोला त्यांनी लावला आहे. NCP on Shahrukh khan: नव्या संसद भवनाचे रविवारी उद्घाटन करण्यात आले.
PM नरेंद्र मोदी यांनी ही नवी संसद भवन देशातील 140 कोटी जनतेच्या स्वप्नांचे प्रतिबिंब आकांक्षा असून ही इमारत
आत्मनिर्भर आणि विकसित भारताची साक्षरता असेल असे म्हटले आहे. यादरम्यान उद्घाटनाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी संसद भवनाचा व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ आपल्या आवाजात शेअर करण्याचं आव्हान केलं गेलं होतं.
त्यांच्या या आवाहनाला बॉलिवूड बादशाह शाहरुख खान ने ट्विटर द्वारे प्रतिसाद दिला. त्याने नव्या संसद इमारतीच्या
समर्थनार्थ ट्विटरवर ट्विट केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस NCP त्यावर प्रतिक्रिया दिली आहे .
महाराष्ट्रातील भाजप नेते आता शाहरुख खानच्या चित्रपटांवर बंदी घालण्याची मागणी करणार नाही…
असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसने लगावला आहे. शाहरुख खान ने ट्विट करताना नव्या संसद भवनाच्या उद्घाटना बद्दल
आनंद व्यक्त केला होता. तसेच त्याने व्हिडिओ आपल्या आवाजात शेअर केला होता. जे लोक आपल्या संविधानाची
रक्षा करतात .या महान राष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाचे प्रतिनिधित्व करतात आणि लोकांच्या विविधतेचे रक्षण करतात
त्यांच्यासाठी हे एक भव्य नवीन घर आहे .नवीन भारतासाठी संसदेची इमारत ,पण भारताच्या गौरवाचे जुने स्वप्न.
जय हिंद !”असं शाहरुखने ट्विटमध्ये म्हटलं होतं. शाहरुख खानचा या ट्विटरवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाइड क्रोस्टो
(clyde crasto) यांनी प्रतिक्रिया दिले आहे.”शाहरुख खान आता नव्या संसदेच्या बाजूने बोलला आहे त्यामुळे
भाजपाचे महाराष्ट्रातील नेते आता त्याच्या चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी करणार नाहीत ,”असा टोला त्यांनी
लगावला आहे. यावेळी त्यांनी शाहरुख खान आणि अक्षय कुमार यांना दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन
करणाऱ्या कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ ट्विट करण्याचा आव्हान केलं, शाहरुख खान आणि अक्षय कुमार दोघांनीही नव्या संसद
भावनांच्या इमारतीवर भाष्य केले. दोघांनी खेळावर आधारित चित्रपटांमध्ये काम केले.
न्याय मागणी करणाऱ्या खेळाडूंच्या समर्थनार्थ ट्विट करण्यापासून अक्षय आणि शाहरुख कोण रोखत आहे?
कोणाची आणि कशाची भीती त्यांना वाटत आहे, अशी विचार त्यांनी मांडले आहेत, शाहरुख खान आणि अक्षय कुमार
यांनी व्हाईस ओव्हर सह रविवारी उद्घाटन झालेल्या संसदेच्या नवीन इमारतीबद्दल आपले विचार व्यक्त करणारे
व्हिडिओ ट्विटर वर शेअर केले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पोस्ट त्यांनी रित्विट केली होती. PM नरेंद्र मोदी 26 मे रोजी
हा व्हिडिओ त्यांनी शेअर केला आणि लोकांना त्यांच्या व्हॉइस ओव्हरसह शेअर करण्याची विशेष विनंती केली होती.
.शाहरुख खानचा पठाण हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांनी त्याच्यावर टीका केली आणि चित्रपटावर
बहिष्कार टाकण्याची मागणी केली होती यामध्ये अनेक भाजप नेत्यांचाही सहभाग होता भगवा रंगाची बिकनी
घातल्याने भाजपाने shaharukh khan वरती आक्षेप घेतला होता.