Monsoon Update

Monsoon
Update: जुलैत मुसळधार ….देशात 94 ते 106 टक्के .हवामान विभागाचा जुलै चा अंदाज जाहीर
जुलै महिन्यात महाराष्ट्रात सर्वत्र शंभर टक्के 106% सामान्य पेक्षा जास्त पाऊस होणार आहे. विभागाचे
महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी वर्तवला आहे. देशात सरासरी 280 पॉईंट 4मीमी. इतका म्हणजेच 94 ते
160 टक्के पाऊस राहील. निना सक्रिय असला तरी भारतीय समुद्री स्थिरांक सकारात्मक असल्याने पाऊस चांगला
पडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता दिल्ली येथील मुख्यालयातून डॉक्टर
महापात्र यांनी पत्रकारांशी ऑनलाइन संवाद साधत ही माहिती दिली आहे .

महाराष्ट्रात जुलैमध्ये पाऊस कसा राहील.
Monsoon
Update:या प्रश्नावर डॉक्टर महापात्रा यांनी उत्तर दिले की महाराष्ट्रात पाऊस सामान्य पेक्षा जास्त म्हणजे 100 ते 160 टक्के
राहील कारण 4 जुलैपासून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असून तो मानसून अधिक तीव्र
करणार आहे. मध्य भारतात चांगला पाऊस महापात्रा यांनी सांगितले की, जुलै महिन्यात मध्य भारतात चांगला
पाऊस राहील. तो सामान्य पेक्षा जास्त राहून 100 ते 160% कोसळले. पूर्वोत्तर भारतातही सामान्य पेक्षा जास्त
पाऊस पडेल. मात्र उत्तर भारतात प्रामुख्याने उत्तर प्रदेश बिहारमध्ये सामान्य पेक्षा कमी राहील. शिवाय असा
मेघालय आणि कर्नाटक सामान्य पेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे. अल अलीनो सक्रिय झाला आहे. मात्र त्याचा
प्रभाव भारतीय मानसून वर पडणार नाही. कारण भारतीय समुद्री स्थिरांक सध्या तटस्थ आहे. तो लवकरच
सकारात्मक होत आहे .त्यामुळे जुलैमध्ये देशात 280 मिमी पाऊस पडेल. 4जुलैपासून जोर
बंगालच्या उपसागराच्या 4 जुलैपासून कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. त्यामुळे मान्सून अधिक तीव्र होईल असा
अंदाज आहे .सध्या कोकण व मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर आहे. मात्र मराठवाडा विदर्भात 1 ते 4जुलै पर्यंत कमी
राहील त्यानंतर राज्यात चांगला पाऊस पडेल.

loksabhanews2024.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *