Maratha Reservation News

Maratha Reservation News: जालना जिल्ह्यातील अंतरवली येथील लाठीमार घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे पडसाद पाहिला भेटत आहेत.
त्या पार्श्वभूमीच्या अनुषंगाने खुंटेफळ येथील समाजसेवक तसेच एक धडाडीचे कर्तुत्वान कार्यसम्राट मराठी युवक
कृष्णा काकडे या तरुणाने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अमरण उपोषणाची हाक दिली आहे.

अनेक वर्षांपासून ची मराठा समाजाची आरक्षणाची मागणी सर्वच राज्यकर्त्यांनी आजपर्यंत नेहमीच वेळोवेळी वेगवेगळ्या कारणाने चालढकल करत
मराठा समाजाची दिशाभूल केली आहे. गोष्टींमध्ये तसे पाहायला जर गेले तर विरोधी पक्ष आणि सरकारमधील तीन पक्ष
या सर्वांनीच मराठा समाजाच्या आरक्षणाकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष केल्याचे आढळून येत आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी मागील काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रामध्ये जवळपास 60 मोर्चे लाखोंच्या संख्येने निघाले होते .
त्याही सत्ताधारी भाजपा शिवसेनेने कोर्टामध्ये चालू असलेल्या खटल्याचे दाखले देत लवकरच मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे आश्वासन दिले ,
मात्र आज पर्यंत त्या संदर्भात कुठलेही ठोस पावले उचलले गेलेली नाहीत.

म्हणूनच आज मराठा समाजाच्या भावना तीव्र होत चाललेल्या आहेत.
त्यातच गेल्या काही दिवसापूर्वी जालना जिल्ह्यातील मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला
सरकारने आणि प्रशासनाने वेगळे रूप दिल्याचे आपण पाहिले आहेत.आंदोलन स्थळी पोलिसांनी मराठा
समाजावर लाठीमार केल्यामुळे मराठा समाज आता पेटून उठला आहे .

आज नाही तर कधीच नाही या भावनेतून वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलने तीव्र होत चाललेली दिसत आहेत..
यासंदर्भात सरकारने तातडीने ठोस पावले उचलून मराठा समाजाच्या आरक्षण संदर्भातील सर्व मागण्यांची तातडीने
पूर्तता करावी म्हणून आष्टी तालुक्यातील खुंटेफळ या गावचे समाजसेवक युवा नेते श्री कृष्णा काकडे उर्फ केके
यांनी आष्टी तालुक्याचे माननीय तहसीलदार यांना समाजाच्या मागण्यांचे निवेदन देऊन गेल्या तीन दिवसापासून आमरण उपोषण सुरू केलेले आहे.

Maratha Reservation News
खुंटेफळ गावातील दक्षिणमुखी मारुती मंदिरामध्ये गेल्या तीन दिवसापासून कृष्णा काकडे यांनी काही युवकांना सोबत घेऊन उपोषण करत आहेत. राज्य सरकारने आता मराठ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये मराठा जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत सर्व
सुरळीत आहे आता जर लवकर मराठ्यांच्या मागण्यांचा विचार सरकारने केला नाही तर सरकारमधील सर्व नेत्यांना याच
याच्या पुढील निवडणुकीत मोठी किंमत चुकावी लागेल हे मात्र नक्की असे कृष्णा काकडे यांनी समाजाशी बोलताना सांगितले.

श्री कृष्णा काकडे यांना संपर्क केला असता त्यांनी सांगितले की जोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला
संदर्भातील निर्णय राज्य सरकार घेत नाहीत तोपर्यंत कुणाच्याही दबावाला बळी न पडता आमचे आमरण उपोषण सुरू

राहील ग्रामीण भागातील युवकांनी कृष्णा काकडे यांच्या उपोषणास पाठिंबा देऊन त्यांच्या मागे खंबीरपणे उभा राहण्याची तयारी दर्शवली आहे

खुंटेफळ ग्रामस्थांची मराठा आरक्षणावर बोलती प्रतिक्रिया

आरक्षणावर OBC चा प्रश्न आला तर छगन भुजबळ , विजय वडेट्टीवार असे नेते समोर येऊन त्यांच्या आरक्षणाचे
रक्षण करण्यासाठी समोर येऊन बोलत आहे .

आणि आपले मराठे राजकारणी किती दिवस झाले मज्ज्जा बगत बसले आहेत. याला जबाबदार तर खरा या राजकारणी
नेत्यांचा कट्टर कार्यकर्ता म्हणणारा वर्ग आहे .

कारण त्यांना माहित आहे काहीही झाले तरी शेवटी हे आपल्याच दावणीला आहेत म्हणून…ते बिन्धास्त आहेत.

आमदार खासदार यांच्या पगार , भत्त्याचा, यांच्या सुरक्षेचा प्रश्न असेल तर एका मिनिटात हे सगळे एक होऊन G.R. निघतो
मग हा प्रश्न का मार्गी लावत नाहीत…लवकर सगळे पुरावे असताना देखील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *