New parliament inauguration: नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यासंदर्भात अनेक विरोधी पक्ष नेतृत्वाकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असताना
राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी या विषयावरती बोलताना केंद्रातील मोदी सरकारवर सडकून टीका केली. आज
म्हणजेच 28 मे रोजी आपल्या भारताचे नवीन संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे,
असे माहिती झाल्यास सर्व समाजातून एकच वाद निर्माण झाला आहे तो म्हणजे या सोहळ्याचे निमंत्रण राष्ट्रपतीला देण्यात
आले नाही. यावरून सर्वच स्तरावरून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यासाठी देशभरातील 20 पक्षांनी
सोहळ्याच्या कार्यक्रमावरती बहिष्कार घातला आहे तर इतर विरोधी पक्ष पण या बहिष्काराच्या सहमतीला होकार देताना
दिसत आहेत.या कार्यक्रमांमध्ये भाजपा सह 17 पक्ष सहभागी होणार आहेत. अशा परिस्थितीमध्येच नवीन संसद
भवनाच्या उद्घाटनाला न जाण्याच्या भूमिकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाठिंबा दिला असून मोदी
सरकार वरती जोरदार निशाणा साधला आहे.
शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले
की संसदेची सुरुवात राष्ट्रपतीच्या उपस्थितीने होते पण राष्ट्रपतींनी संसदेचे उद्घाटन करावे हे सुद्धा मान्य करण्यात आलं
नाही त्यामुळे कोणाला विश्वासात न घेताच सर्व निर्णय घ्यायचे असतील तर विरोधी पक्षातील काही ज्येष्ठ सहकाऱ्यांनी
आपल्या संसदेच्या उदघाटनाला जाऊ नये अशी भूमिका त्यांनी माध्यमांसमोर मांडली त्या भूमिकेला शरद पवार यांचा
स्पष्ट पाठिंबा आहे असे त्यांनी दर्शवून दिले.
राष्ट्रपतीच्या अन उपस्थिती मुळे सर्व स्तरातून नाराजी..
संसदेची नवी इमारत बांधली जाणार हे आम्ही वर्तमानपत्रात वाचले. अनेक वर्षापासून संसदेचा सदस्य आहे संसदेची नवी
इमारत बांधली जाणार हे आम्ही वर्तमानपत्रात वाचले असा महत्त्वाचा निर्णय घेताना संसदेच्या सदस्यांना विश्वासात घेण्याची
गरज होती भूमिपूजन करतानाही कोणाला विश्वासात घेतले नाही आता इमारत तयार झाली आहे असे शरद पवार यांनी सांगितले.
loksabhanews2024.comराष्ट्रपती हे फक्त नावालाच का?
भारताच्या संविधानाची संरचना पाहता सर्व घटकातील महत्त्वाचे स्थान असणारे राष्ट्रपतीचे पद हे यावेळी न जुमानता
साधूना महत्व देण्यात आले आहे. देशाची वाटचाल ही विकास कामांच्या तत्त्वावरती नसून पाषाण आणि तथाकथित
विचारांच्या धरतीवर चाललेली आहे असे आदिवासी आणि इतर स्तरातील जनतेचे सूर ऐकायला येत आहेत…
मोदी सरकारकडून नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाची जय्यत तयारी..नवीन संसद भवनाच्या कार्यक्रमाची एक कार्यक्रम
पत्रिका समोर आली आहे तसेच या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने दिल्लीतील वाहतूक व्यवस्था बदलण्यात आलेली
असून त्या संदर्भातील माहिती वाहतूक पोलिसांकडे देण्यात आलेली आहे
सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी देखील नवीन संसद भवनाच्या मुद्द्यावरून भाजप सरकारला लक्ष्य केले. “संसदेचा इव्हेंट करू नका, ते लोकशाहीतलं आमचं मंदिर आहे. ही लोकशाही आहे, दडपशाही नाही”, अशा शब्दांत सुप्रिया सुळेंनी टीका केली. “