Pm Modi in Australia

pm modi in australia :Nrende Modi In Sydney: नरेंद्र मोदी म्हणाले देशातील डिजिटल क्रांतीने लोकांचे जीवनमान बदलले.

PM Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये त्यांनी सिडनीत भारतीय समुदायाच्या एका
कार्यक्रमात संबोधित केले त्यावेळी त्यांनी भारताने केलेली प्रगती मांडली आहे, त्याच वेळी दोन्ही देशांमधील मैत्रीचाही उल्लेख
त्यांनी केला आहे. सिडनी पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत भारतीय समुदायाच्या एका
कार्यक्रमांमध्ये ते सहभागी झाले त्यावेळी गणपती बाप्पा मोरया भारत माता की जय आणि मोदी मोदी च्या घोषणा देण्यात
आल्या कार्यक्रमादरम्यान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ऑस्ट्रेलियाचे पीएम अँथनी एलबानीज हेही होते सिडनीच्या ऑलिंपिक
पार्कमध्ये असलेल्या स्टेडियम मध्ये Pm Modi यांनी 20000 भारतीयांना संबोधित केले.

सांस्कृतिक आणि रंगारंग कार्यक्रमा मधून पंतप्रधान मोदींचे स्वागत करण्यात आले.

pm modi

डिजिटल क्रांतीने जीवन बदलले भारतीय लोकांचे जीवन डिजिटल क्रांतीने बदलले आहे आता सर्वसामान्यांपासून ते मोठमोठ्या
दुकानांपर्यंत डिजिटल क्रांती आहे शाळांचे प्रमाणपत्र गिलायसन सर्व डिजिटल लॉकर वर उपलब्ध आहे. नरेंद्र मोदी काय म्हणाले.

1).भारतातील प्रत्येक गरिबासाठी माझे स्वप्न होते ते पूर्ण झाले सर्व गरिबाचे बँक खाते झाली आहे देशातील 50 कोटी भारतीयांची
खाती उघडली आहे त्यांना बँकांचे सर्व फायदे मिळत आहे जनधन बँक खाते आधार आणि मोबाईलची लिंक आहे. 2.जगात अनेक देशात बँकिंग प्रणाली संकटात आहे परंतु भारताची बँकिंग प्रणालीचा कौतुक होत आहे भारताने विक्रमी निर्यात केली आहे .

3).कोरोनाच्या संकटांमध्ये अनेक देशांना त्यांच्या नागरिकांना पैसे पाठवण्यात अडचणी होत्या पण भारतात हे काम काही
क्षणातच झाले 40% रियल टाईम डिजिटल एकट्या भारतात होतात आज फळभाज्या किंवा पाणी पुरीच्या गाड्या असो
सगळीकडे डिजिटल व्यवहार होत आहे.

4).जगामध्ये जेव्हा संकट येते तेव्हा भारत मदतीसाठी असतो कोणतीही आपत्ती आली तर भारत मदतीसाठी येतो आज भारत
ग्लोबल ग्रोथच्या जोरावर काम करत आहे आम्ही जगाला जोडण्यासाठी काम करत आहोत सर्वांचा पाठिंबा सर्वांचा विकास
सर्वांचा विश्वास आणि सर्वांचे प्रयत्न हाच आपल्या सरकारचा आधार आहे ही आमची दृष्टी आहे.

5).क्रिकेट आपल्याला वर्षानुवर्षी जोडत आहे पण आता टेनिस आणि चित्रपटही आपल्याला जोडत आहेत आमची खाण्याची
पद्धत जरी वेगळी असली तरी आता मास्टरशेप आम्हाला जोडत आहे ऑस्ट्रेलिया आणि भारताची ही विविध खुल्या मनाने स्वीकारली आहे.

6) . भारतात जेव्हा तुम्ही येणार तुमच्यासोबत ऑस्ट्रेलियन मित्रांना घेऊन या त्यामुळे त्यांना भारतातील संस्कृती जवळून पाहता
येईल त्यांना भारत समजून घेता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *