Seema Haider:उत्तर प्रदेश एटीएसकडून सीमा हैदरची गेल्या अनेक तासांपासून चौकशी सुरु आहे. प्रत्येक प्रश्नाच्या
उत्तरात सीमा म्हणत आहे की, सचिनच्या प्रेमासाठी सीमा पार करून भारतात आलीAnti Terrorist Squad)
म्हणजेच एटीएस (ATS) कडून सीमा हैदरची गेल्या अनेक तासांपासून चौकशी सुरु आहे.
सीमाचा गुप्तहेर असण्याच्या आणि दहशतवादाशी
तसेच पाकिस्तानी सैन्याशी संबंध असल्याचा दावा केला जात आहे.
याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश एटीएस (ATS) कडून कसून चौकशी सुरु आहे. सीमा नेपाळमार्गे अवैधरित्या भारतात
आली, यामुळे भारताच्या सुरक्षेसंदर्भातही अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा
हैदरची यूपी एटीएस सातत्याने चौकशी करत आहे
.
“ATS”कडून सीमा हैदरची चौकशी
1)एटीएसकडून सीमा हैदरची चौकशी:
- सीमा हैदरच्या एटीएस चौकशीत अजून काही महत्त्वाची माहिती समोर आलेली नाही. सीमा हैदर प्रत्येक प्रश्नाला
एकच उत्तर देत आहे. एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमाला कोणताही प्रश्न विचारला जात असला तरी - ती फक्त एकच उत्तर देत आहे. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरात ती सांगते की, सचिनच्या प्रेमापोटी ती भारतात आली आहे.
- 2).पोलिसांकडून कसून तपास सुरु:
- एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमा हैदरने अत्यंत कडक प्रशिक्षण घेतले असावे. त्यामुळे ती
एकच उत्तरे देत असून जबाव बदलत नसावी. त्यामुळेच आता पोलीस चौकशीदरम्यान मानसशास्त्रज्ञाला सोबत घेऊन
तपास करण्याची शक्यता आहे. - 3).नेपाळमध्ये पहिल्यांदा भेटले सचिन आणि सीमा
- उत्तर प्रदेश एटीएसच्या टीमने सीमा हैदर आणि सचिन मीना या दोघांना एकत्र बसवून अनेक महत्त्वाच्या
पुराव्यांच्या आधारे चौकशी केली. यामध्ये त्यांच्या नेपाळमधील भेटीबाबतही प्रश्न विचारण्यात आले होते. पाकिस्तानी
सीमा हैदर
आणि उत्तर प्रदेशच्या सचिन मीना यांची ओळख ऑनलाईन गेम खेळताना झाली. त्यानंतर ते
पहिल्यांदा नेपाळमध्ये एकमेकांना भेटले, असं दोघेही चौकशीत सांगत आहेत.
Seema Haider - 4).कोर्टाकडून दिलासा :
- पाकिस्तानी सीमा हैदर मे महिन्यात नेपाळमार्गे बेकायदेशीरपणे भारतात दाखल झाली होती. त्यांची नेपाळमध्ये
पहिली भेट झाली. त्यानंतर सीमा हैदर आणि तिचा भारतीय प्रियकर सचिन मीनासोबत ग्रेटर नोएडामध्ये राहत आहे. - सीमाजवळ अनेक फोन आणि इतर गोष्टी सापडल्याने तिच्यावरचा संशय बळावला, त्यानंतर यूपी एटीएसने
सीमा हैदरला ताब्यात घेतलं. सीमा हैदर 30 वर्षांची आणि सचिन मीना 22 वर्षांचा आहे.
या दोघांना ग्रेटर नोएडा पोलिसांनी 4 जुलै रोजी
अटक केली होती, पण न्यायालयाने 7 जुलै रोजी दोघांना जामीन मंजूर केला. त्यानंतर आता त्यांची एटीएस चौकशी सुरु
आहे. पबजी गेम खेळताना सीमा आणि सचिन यांनी ओळख झाली. त्यानंतर सचिनच्या प्रेमासाठी
सीमा हैदर बेकायदेशीरपणे भारतात आली. यामुळे भारताच्या सुरक्षेचा धोका असल्याचीही चिंता व्यक्त केली जात आहे. - 5).बॉर्डरवर पेहराव बदलला..
- केंद्रीय तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनूसार, सीमा हैदर ही देशातील ग्रामीण भागातील महिला वाटावी यासाठी
तिचा मेकओव्हर करण्यात आला होता. इतकेच नाही तर तिला साधी साडी परिधाण करण्यास दिली होती, तिच्या चारही
मुलांचे पौषाखही बदलण्यात आले होते. जेणेकरून सीमा आणि तीची मुले भारतीय वाटावीत. तपास यंत्रणानुसार अशा
गोष्टी मानवी तस्करी किंवा सेक्स रॅकेट सारख्या प्रकरणात होत असतात. तसेच सीमा ज्या भाषेत बोलते आहे, त्या भाषेची
ट्रेनिंग नेपालमध्ये दिली जाते. पाकिस्तानी हॅंडलर अशा प्रकारच्या ट्रेनिंग देऊन महिलांकडून बेकायदेशीर घटना
घडवून आणण्यासाठी त्यांना सीमा ओलांडून भारतात पाठवतात. त्यामुळे आता तपास यंत्रणांनी या पाकिस्तानी हॅंडलरचा
तपास सुरु केला आहे
Seema Haider
- संशय निर्माण करणारे 10 प्रश्न
- 1) 4 मुलांची आई स्वत:ला पाकिस्तानच्या लहान शहरातली रहिवाशी म्हणते, मग ती PUBGवर दिवसभर व्यस्त कशी असते?
- 2) पाचवी पास सर्वसामान्य महिलेकडे दोन पासपोर्ट कशासाठी आहेत?
- 3) आपल्या 4 मुलांना सोडून सचिनला भेटायला नेपाळला कशी आली?
- 4)दुसऱ्यांदा पाकिस्तानी सीमा ओलांडून परतल्यावर चार मुलांसाठी नवीन पासपोर्ट बनवून ती कशी परतली?
- 5) सीमाकडे इतके पैसै आले कुठून? घर विकल्याचे सीमा सांगते. पण पाकिस्तानमध्ये संपत्तीत महिलांना इतके अधिकार आहेत का?
- 6)नवऱ्याच्या नकळत तिने घर कसे विकले?
- 7)सीमा दुबईला जाते आणि पाकिस्तानी पैशाना दिरहममध्ये बदलते आणि दुबईत आरामात हॉटेल आणि कॅबची बुकींग कशी करते.
- 8) घुसखोरीच्या आरोपाखाली अटक होऊन सुद्धा ती इतकी शांत का दिसते?
- 9) सीमाने तिचा आणि तिच्या चार मुलांचे डुप्लिकेट आधारकार्ड कसे बनवले?
- 10) पाकिस्तानमध्ये ज्या फोनचा वापर केला होता, त्यामधील एकही फोन ती भारतात का घेऊन आली नाही.
नेपालमध्ये तिने इतर व्यक्तीच्या हॉटस्पॉटच्या आधारावर व्हॉट्सअॅप कॉल केले. तसेच पाकिस्तानात पर्सनल लॅपटॉप का
सोडून आली?
Yamuna Water Level-यमुनेच्या पाण्याची पातळी208.05 मीटरचा टप्पा ओलांडली