Adipurush movie review

Adipurush movie review:
कपडा तेरे बाप का,तेल तेरे बाप का,आग भी तेरे बाप की ओर जलेगी भी तेरे बाप की.
डायलॉग ऐकताना तुमच्या डोळ्यासमोर दाढी वाढवलेला, एक खांदा वर केलेला पुष्पा आला असेल किंवा बाहुबलीमधला भाल्लालदेव आहे.
हा डायलॉग आहे हनुमानाचा आणि पिक्चर आहे आदिपुरूष..
गाणी, VFX, 600 कोटीच बजेट आणिरामायण ची स्टोरी,आदीपुरूषन इतका खतरनाक
की हजार दोन हजार कोटींची कमाई किरकोळ होईल अशी चर्चा होती.
पण आदीपुरूष सिनेमा आपटला रीलीजच्या पहिल्याच दिवशी आदीपुरुष रिलीज झाल्यावर पाच सहा तासातच काही ट्रेंड व्हायला लागलं.
बॉयकट आदी पुरुष. एवढी हवा करून रिलीज झालेला हा पिक्चर रिलीज त्याच दिवशी का आपटला? लोकांच्या आणि समीक्षकांच्या पसंतीला का उतरला नाही ?.याचे उत्तर आपण पाहूया.

Adipurush movie
[1] VFX:
आदिपुरूषच VFX गंडल्याची चर्चा सिनेमा रिलीज होण्याआधी खूप रंगली होती.
ट्रेलर आणि फायनल ट्रेलर मध्ये रावणाचा पार्ट कट करून डॅमेज कंट्रोल झालं .
निळ्या रंगाचा रावण ट्रेलर मध्ये झाकण्यात आला.पण नंतर मात्र फ्लॉप शो झाला.
रावणाला दहा डोके दाखवण्यात आली. त्यातली पाच खाली आणि पाच वर कुठे बघतय कुठला डोकं कोणाशी बोलतोय, याचा मेळ नाही .
कुठल्या डोक्याचे कान एकमेकांना जोडले गेलेत. कुठल्यातरी डोक्याचे दाढी आणि केस जोडले गेलेत.
हे इथे संपत नाही तर रावण हा तो मोठा शिवभक्त होता, आणि विद्वान होता, प्रचंड बलशाली होता.
हे आपण खूप आधीपासून वाचत आलो आहोत .
पण आदी पुरुष मध्ये रावण आजगरांनी बनवलेल्या मंचकावर झोपलेला दिसतो असं दाखवण्यात आला आहे .
अजगरांची क्वालिटी जुन्या पिक्चर मधल्या हिरोईनची नागिन व्हायची तसली आहे.VFX झाल् जाणवतं ते म्हणजे लंका जाळलेल्या सीन मध्ये .
हनुमानाच्या मागे लागलेली असुर सेना कार्टून मध्ये दाखवतात तसे दाखवले किंवा मग स्वस्तातल्या थीनोससारखे .
तरी प्रभास च्या बाहुबली चा उदाहरण घेतलं.
महलापासून लढाई पर्यंत सगळं VFX लार्जर Than लाईफ वाटत होतं.
रावणाची सोन्याची लंका आणि प्रचंड हिरवीगार अशोक वाटिका या दोन्ही गोष्टी भव्य दिव्य दाखवता आले
असत्या पण VFX ने हे पेक्षा हे सर्व अंधारात ढकलल.
खतरनाक VFX बघायची अपेक्षा मनात ठेवून आदी पुरुष बघायला जातात आणि कार्टून किंवा व्हिडिओ गेम्स फील घेऊन बाहेर येतात.

[2].स्टोरी: रामायनाची स्टोरी ऐकत आणि बघत आपण सगळेच लहान असे मोठे झाले.
त्यामुळे यात कधी काय होतं. हे सगळं आपल्याला पाठ साहजिकच प्रेक्षक आदीपुरुष कडून जास्त अपेक्षा करत नाही.
पण आदीपुरुष नावामुळे श्रीरामाच्या आयुष्याची आणि सदगुणांची गोष्ट असेल अशी अपेक्षा असते.
पण कैकेयी, दशरथ ही पात्र बाजूला करून पिक्चर थेट आपल्याला श्रीराम सीता वनवासाला जातात.
तेथून सुरू झालेला दिसतो. ना कुठल्या पात्राची बॅट स्टोरी आहे ना कुंभ करण्याच्या झोपेतून उठण्याचे सीन आहे.
बिभीषण श्रीरामाला मदत करताना ची गोष्ट रामचरितमानस असेल
इतर पुस्तक आणि या आधी रामायणावर आलेल्या सिनेमासीरिअल्स मध्ये जटायु श्रीरामाचा सीन आहे.
त्यातून श्रीरामाचे भावनिक आणि कर्तव्यनिष्ठ असणं अधोरेखित केलेले आहे.
मात्र आदीपुरुष मध्ये श्रीराम सीता हरण बघतो.
आणि जटायुशी दोन शब्दांचा संवादही होत नाही . हे सगळं सोडा शिवतांडव स्तोत्र रचना रावण मास घालून वेल्डिंग करताना दाखवाला आहे.
थोडक्यात लहानपणापासून जे बघत आलो आहोत. त्यापेक्षा वेगळं असं काहीही या सिनेमांमध्ये नाही आणि जे आहे ते अर्धवटच .

[3].वेशभूषा:
श्रीराम म्हणजे भगवं वस्त्र, खांद्यावर धनुष्य, भरताने जपलेल्या पादुका पण प्रत्यक्षात दिसतं काय तर श्रीरामांनी चामड्याचे जॅकेट आणि बूट घातलेत .
एका सिनला तर पांढरे पायघोळ पांढरा ड्रेस घातलेले दिसून येत आहे.
श्रीराम आपल्याला दिसतात . सोन्याच्या लंकेचा अधिपती असणारा रावण कधी टी-शर्ट घालतो तर कधी कुर्ता घालतो.
केसांचा स्पाईक वाला हेअर कट करतो पण डोक्यावर मुकुट तेवढा घालत नाही .
सिनेमा मधली बरीच पात्रे मुकुट किंवा इतर दागिने घालत नाहीये.सगळीकडे नुसता काळा रंगच दिसत राहतो .
आता येऊ शेवटच्या आणि सगळ्यात जास्त घडलेल्या गोष्टीकडे डायलॉग इंद्रजीत हनुमानाच्या शेपटीला आग लावतो .
विचारतो जली ना अभी तो और जलेगी जिसकी जलती है वही जानता है.
याच्यावर उत्तर म्हणून प्रभु हनुमान आणि उत्तर देत थेट इंद्रजीत चा बाप काढतो.
तेवढा एकच डायलॉग खराब नाहीये तर अशोक वाटिकेत घुसलेल्या हनुमानाला रावण म्हणतो की,

तेरी बुवा का बगीचा है क्या जो हवा खाने चला आया ..Adipurush Movie

तर हनुमानाचे “उत्तर काय येतं, अगर हमारी बहन को चेडेगा तो हम उनकी लंका लगा देंगे“. प्रामाणिकपणे सांगा डॉन नंबर वन मधले सूर्या भाई के डायलॉग यापेक्षा भारी होते की नाही. सगळ्यात डेंजर परिस्थिती येते ती राम सेतू बांधताना मदत केली होती म्हणून खारुताई च्या अंगावरती हात फिरवत तिला शाबासकी दिली होती .आजही त्या बोटांचे ठसे खारुताईच्या अंगावरती दिसून येतात. साधी सोपी गोष्ट आजवर आपण ऐकत आलो आहोत हे श्रीरामाचे व्यक्तिमत्व कित्येक पटींनी मोठ करते. आदी पुरुष मध्ये वानर सेनेला मोटिवेशनल स्पीच देतात आणि युद्धाला तयार करतात. बाहुबली मध्ये दाखवलं आहे ना तसंच आहे. अंगदाने केलेलं गर्वहरण कुंभकर्ण आणि रावणाचा बंधुप्रेम डायलॉग मधून दाखवण्यात आलेल्या नाहीत. लॉक डाऊन च्या दिवसात रामानंद यांनी डायरेक्ट केलेल्या रामायण सिरीयल चा रिपीट टेलिकास्ट दाखवला होता. जो लोकांना नोक्यालिस्त करून गेला. रावणाची भूमिका साकारणाऱ्या गोविंद त्रिवेदी यांना अयोध्या मध्ये प्रवेशना करण्यात आला आहे. श्रीरामाच्या दिसण्यापासून रावणाच्या हसण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट अनेकांना जशीच्या तशी आठवते. ती म्हणजे रामानंद यांच्या डायरेक्शन मुळे .श्रीरामांचे व्यक्तिमत्व म्हणजे किती मोठे आहे. हे दाखवायला रावणाला गेम ऑफ करून विलन करण गरजेचं नसतं .युद्धापलीकडचा कर्तव्यनिष्ठ महा पराक्रमी आणि तितकाच मायाळू श्रीराम दाखवणे गरजेचे असते .जे रामानंद सागर यांना जमलं.the legend of prince ramॲनिमेशन पट बनवणाऱ्या लोगो का आणि राम मोहन यांना जमलं .पण प्रचंड मोठी टीम असलेला भरपूर मोठा बजेट असलेला तंत्रज्ञानाचा वापर करता येणारा VFX लुक आणि डायलॉग मध्ये घडलेल्या आदीपुरुष टीमला हे काहीही जमले नाही .जो आदीपुरुष सिनेमा कमाईच्या संख्येपेक्षा लोकांच्या मनाला हात घालू शकत होता तो मात्र प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी आपटला गेला आहे.

2 thought on “Adipurush movie review: VFX च्या नावाखाली फसलेला आदिपुरुष.”
  1. Day-wise Adipurush Box Office Collection
   Day India Net Collection (in ₹ Crores)
   Day 1 [1st Friday] ₹ 86.75 Cr
   Day 2 [Saturday] ₹ 60 Cr
   Day 3 [Sunday] ₹ – Cr (Updating Soon)
   Total ₹ 146.75 Cr

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *