Teachers Exam: शिक्षणाचा दर्जा ढासळत असल्याचा आरोप होत असताना मराठवाड्याचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर (Teachers Exam) शिक्षणाचा दर्जा ढासळल्याने आता शिक्षकांचीच परीक्षा, तारीखही ठरली; केंद्रेकरांनी घेतला होता निर्णय यांनी काही दिवसांपूर्वी वेगवेगळ्या विषयांवर सर्वेक्षण करत शिक्षकांची (Teachers) परीक्षा (Exam) घेण्याचा निर्णय घेतला होता. ज्यात प्रशासनाकडून मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात शिक्षकांची परीक्षा घेण्याबाबत ठरले होते. तर आता या परीक्षांची तारीख देखील ठरली आहे. 30 जुलै आणि 31 जुलै या दोन दिवशी ही परीक्षा होणार आहे. त्यामुळे पहिल्यांदाच थेट शिक्षकांची परीक्षा होणार असल्याने याकडे पालकांसह विद्यार्थ्याांचे लक्ष लागले आहे.

आठ जिल्ह्यात करण्यात आला सर्वेक्षण…

शिक्षणाचा दर्जा ढासळत असल्याचा आरोप होत असताना, केंद्रेकर यांनी याची गंभीर दखल घेतली होती. त्यामुळे त्यांनी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात सुरुवातीला सर्वेक्षण केले. ज्यात प्रत्यक्षात शाळेत जाऊन मुलांच्या गुणवत्तेची पाहणी करण्यात आली. या पाहणीत अनेक ठिकाणी खूपच वाईट परिस्थिती असल्याचे समोर आले होते. तर लातूर जिल्ह्यात जेव्हा सर्वेक्षण करण्यात आले त्यावेळी आठवीच्या 45 टक्के मुलांना भागाकार देखील करता येत नव्हता. लातूर जिल्ह्याचे सीईओ अभिनव गोयल खूप चांगले काम करतात. मात्र त्यांच्या जिल्ह्यात अशी परिस्थिती असेल तर इतर जिल्ह्यात देखील असणारच, असे केंद्रेकर ‘एबीपी माझा’ला मुलाखत देताना म्हणाले होते. विशेष म्हणजे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात वेगवेगळ्या विषयावर सर्वेक्षण करण्यात आले, सर्वच ठिकाणी अशीच परिस्थिती असल्याचे जाणवले असल्याचं देखील केंद्रकर म्हणाले होते. त्यामुळे थेट शिक्षकांचीच परीक्षा घेण्याचा निर्णय केंद्रकर यांनी घेतला होता. तर 30 आणि 31 जुलै या दोन दिवशी ही परीक्षा होणार आहे.
कशी घेतली जाणार परीक्षा….

Education
New 2023
Update

पहिली ते दहावीच्या शिक्षकांच्या परीक्षा घेतली जाणार आहे.

संस्था आणि त्यांच्या शिक्षकांची देखील परीक्षा घेतली जाणार आहे.

तसेच या परीक्षांचा स्तर कठीण असणार असून, सर्वच शाळेत अशा परीक्षा घेतल्या जाणार आहे.

या परीक्षेत निगेटिव्ह मार्क असणार आहे. तसेच प्रश्नांना उत्तरांचे पर्याय दिले जाणार आहे.

विज्ञान, गणित आणि इंग्रजी या तीन विषयांच्या परीक्षा अधिक भर असणार आहे.

परीक्षा देणे बंधनकारक नसणार आहे, इच्छुक शिक्षकांना या परीक्षेत बसता येणार आहे.

परीक्षेचे नियोजन कसे असणार?

मराठवाड्यातील शिक्षकांची परीक्षा 30 आणि 31 जुलैला पार पडणार

मराठवाड्यातील 18 हजार शिक्षकांनी परीक्षा देण्याची तयारी दर्शवली आहे.

यासाठी प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा सेंटर असणार आहे.

पहिले ते दहावीच्या शिक्षकांची परीक्षा घेतली जाणार आहे.

जिल्हा परिषद आणि अनुदानित संस्थांच्या शिक्षकांची ही परीक्षा होणार आहे.

शिक्षणाचा गुणवत्ता ढासळल्यामुळे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या निर्णयानंतर ही परीक्षा होत आहे.

नवीन आयुक्त काय निर्णय घेणार?

शिक्षणाचा दर्जा सुधारावा आणि गुणवत्तेत सुधारणा व्हावी यासाठी शिक्षकांच्या परीक्षा व्हाव्यात असे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांचे स्वप्न होते. मात्र त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली असून येत्या 3 जुलैला ते पदभार सोडणार आहेत. त्यामुळे नवीन येणारे विभागीय आयुक्त शिक्षकांची परीक्षा घेण्याचा निर्णय कायम ठेवतात की, त्याला ब्रेक लावतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *