Good news for Farmer :शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी मोठी बातमी : शेतकऱ्यांसाठी खुशखबर नुकसान भरपाई ची रक्कम खात्यात येणार…..Good news for Farmer
मराठवाडा आणि छत्रपती संभाजीनगर मधल्या शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी.अतिवृष्टी ,पूर्व चक्रीवादळ
अशा नैसर्गिक संकटांपासून शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाले ल्या शेतकऱ्यांना पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे व
आर्थिक मदत व्हावी. याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती
प्रतिसाद निधीतून करण्यात आलेल्या विविध दराने मदत दिली जाते.Good news for Farmer
शेतकऱ्यांच्या पिकाच विविध नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास त्यांना किती प्रमाणात नुकसान भरपाई द्यावी.
यासंदर्भातील सुधारित दर व निकषाचा शासन निर्णय एक नोव्हेंबर 2022 पासून लागू करण्यात आलेला आहे.
राज्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केलं.
अवेळी पाऊस ही राज्य शासनाकडून आपत्ती म्हणून घोषित करण्यात आलेली असल्यामुळे 33 टक्क्यांपेक्षा जास्त
शेती पिकांचे नुकसान झाल्या शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात भरपाई दिली जाते. मार्च 2023 या कालावधीत झालेल्या
शेती पिकाच्या नुकसानी बाबत अनुद्यय दराने शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत सर्व विभागीय आयुक्त यांच्याकडून
आठ मार्च 2023 च्या पत्रांमुळे मागण्यात आले होते.
गेल्या वर्षी म्हणजे जून 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टी अवकाळी पाऊस वादळी वारे गारपीट अशा नैसर्गिक
आपत्तीमुळे नगर जिल्हा पाच लाख 89 हजार 373 हेक्टर क्षेत्रातील दहा लाख 7 हजार 946 शेतकऱ्यांचे 1142 कोटी
58 लाखांचे नुकसान झाले होते.
2022 च्या सप्टेंबर ऑक्टोंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई आता शेतकऱ्यांना मिळणार
आहे. मराठवाड्यासाठी 763 तर छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यासाठी 226 कोटींचा निधी प्राप्त झालाय.
संभाजीनगर जिल्ह्यात चार लाख 1 हजार 446 शेतकऱ्यांना कोरडवाहूसाठी प्रती हेक्टर 8500 मिळतील. नुकसान भरपाईची रक्कम खात्यात जमा होणार आहे.
लागणारी कागदपत्रे खालील प्रमाणे
1. सातबारा
2. आठ
3. बँकेचे पासबुकची झेरॉक्स
4. आधार कार्ड ची झेरॉक्स ही तलाठ्याकडे जमा कराव