Review meeting in Ashti

Review meeting in Ashti:मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष शिवश्री इंजि. तान्हाजी बापू जंजिरे साहेब यांच्या
उपस्थितीत बैठक संपन्न झाली. यावेळी तालुक्याचे भूमिपुत्र तसेच वृद्धेश्वर साखर कारखान्यांचे व्यवस्थापकीय संचालक (M.D.)
शिवश्री जालिंदर पवार साहेब हे उपस्थित होते.Review meeting in Ashti

Review meeting

यावेळी त्यांनी सद्य स्थितत समाजापुढे अनेक गंभिर विषय असल्याचे सांगुन कृषी, शिक्षण, नौकरी व विवाह विषयक
समस्या गंभीर होत आहेत, याविषयावर सर्वांनी काम केले पाहिजे तसेच जी मदत लागेल ती करण्यास मी तयार असल्याचे
सांगुन त्यांनी सर्वांना आश्र्वशित केले.

मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष शिवश्री इंजि. तान्हाजी बापू जंजिरे साहेब

तर अध्यक्ष तान्हाजी जंजिरे यांनी यावेळी बोलताना सांगितले की ,मराठा सेवा संघ ही एक सामाजिक संघटना असुन
युगपुरुष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांच्या विचाराने प्रेरित होऊन गेली 30 वर्षे पासुन विविध सामाजिक प्रश्नावर
मराठा सेवा संघ व त्यांचे 33 कक्ष विविध क्षेत्रामध्ये चांगल्या रितीने काम करत आहे व आम्हीही यापुढे याच
विचारांनी काम करू असे सांगीतले.
यावेळी शिवश्री रघुनाथजी आवारे ,शिवश्री लक्ष्मण रेडेकर बापू ,शिवश्री बन्सीधर मोरे बापु,शिवश्री बाबासाहेब मुटकुळे ,
शिवश्री सीतारामजी पोकळे,शिवश्री शशिकांत कन्हेरे आदी उपस्थित होते.

मराठा सेवा संघ हा शब्द वाचला की अनेकांना प्रश्न पडतो ही नेमकी
कसली संस्था आहे त्याचे काय काम आहे त्याच्यासाठी हा आढावा

एक सप्टेंबर 1990 रोजी बहुजन समाजातील सर्व घटकांनी एकत्र यावं या उदात्त हेतूने (founder) प्रेसिडेंट
पुरुषोत्तम जी खेडेकर यांनी इतिहासाचा सखोल अभ्यास व चिंतन करून मराठा सेवा संघाची स्थापना केली मराठा सेवा संघ व
त्या अंतर्गत 33 कक्षांच्या माध्यमातून सर्व मराठा समाजाच्या अथक परिश्रमामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर
पुरोगामी विचारांचा सशक्त व राष्ट्रनिर्मिती करिता बलशाली संघटन म्हणून मराठा सेवा संघ सर्वांना सुपरचित झाला आहे
सर्वात मोठी गोष्ट म्हणजे शेकडो वर्षापासून पुरुषप्रधान संस्कृती असताना सुद्धा मराठा सेवा संघाने संपूर्ण देशाला अभिमान वाटावा .
असा मातृत्व सिंदखेड राजा येथे मासाहेब जिजाऊंच्या जन्मस्थळी जिजाऊ सृष्टीचा भव्य दिव्य प्रकल्प हाती घेतला आणि अतिशय जलद
गतीने हा
प्रकल्प पूर्ण होत आहे संपूर्ण जगाला हेवा वाटावा असा हा प्रकल्प हा मातृ सत्तेचा गौरव सन्मान फक्त मराठा सेवा
संघच करू शकतो. मातृ शक्तीचा प्रत्यक्ष कृतीतून सन्मान करणार जगातील एकमेव संघटन म्हणजे मराठा सेवा संघ.

(Chief Executive Engineer Marathwada) विजय घोगरे सर प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य…

यांनी धार्मिक गोष्टींचा विचार करताना धर्माचा उदात्त विचार सांगणारी “शिवधर्म गाथा” दिली. आपली नाणी, वाणी, लेखणी
आणि करणी आपण आपल्याच लोका विरोधात वापरू नये ही आचारसंहिता दिली. युवकांना बुटाच्या पॉलिश पासून डोक्याच्या
मालिश पर्यंत कोणताही व्यवसाय करण्याची दृष्टी दिली. धर्मसत्ता, राजसत्ता, शिक्षण सत्ता ,अर्थ सत्ता यांचे महत्त्व समाजाला
पटवून दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *