Monsoon update

Monsoon update:येत्या 24 तासात पुणे मुंबई सह उर्वरित महाराष्ट्रात मोसमी वाऱ्यांसह पाऊस पोहोचणार असल्याचा
अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे पुणे बंगालच्या उपसागरात तयार झालेली चक्रीय स्थिती तसेच उत्तर पूर्व
अरबी समुद्रात चक्रीय स्थिती तयार झाली आहे ही स्थिती नैऋत्य मोसमी वारे पुढे सरकण्यास पोषक आहे.Monsoon update
त्यामुळे शनिवारी मोसमी वाऱ्यांनी कोकणातील अलिबाग मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर तर विदर्भातील नागपूरपर्यंत मुसंडी
मारली आहे. येत्या 24 तासात पुणे मुंबई सह उर्वरित महाराष्ट्रात मोसमी वारे पोहोचणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने
वर्तवला आहे बुधवार पर्यंत 28 जून राज्यातील विदर्भ आणि कोकणात मुसळधार ते अति मुसळधार तर मध्य महाराष्ट्र आणि
मराठवाड्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाजही हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

Mansoon update

बीपीरजॉय चक्रीवादळाने मोसमी पाऊसात आवश्यक असलेले सर्व बाष्प खेचून घेतले: त्यामुळे दहा ते बारा
दिवसांपासून कोकणातील रत्नागिरीच्या भागांमध्ये मोसमी वारे थपकले होते. परंतु शुक्रवारी मात्र बंगालच्या उपसागरात तयार
झालेल्या चक्रीय स्थितीमुळे या वाऱ्यांनी झपाट्याने प्रगती करत विदर्भापर्यंत मजल मारली शनिवारी त्यामध्ये आणखी वाढ होऊन
कोल्हापूर अलिबाग आणि नागपूरपर्यंत मोसमी वाऱ्यांनी वाटचाल केलीपूर्व मध्य अरबी समुद्रते म्यानमार पर्यंत चाळीस ते
पंचेचाळीस आणि त्यानंतर 65 किमी या वेगाने वारे वाहणार आहेत.मात्र त्याचा परिणाम मोसमी वाऱ्यांवर होण्याची
शक्यता नाही 28 जून पर्यंत विदर्भात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस तर कोकणात अति मुसळधार पाऊस याशिवाय
मध्यमहाराष्ट्र आणि मराठवाड्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

Maharastra Mansoon update

पोषक स्थितीमुळे मोसमी वाऱ्यांनी मध्य अरबी समुद्र कर्नाटकचा काही भाग तेलंगण छत्तीसगड मध्य प्रदेशाचा
बहुतेक भाग उत्तर प्रदेशाचा काही भाग उत्तराखंडचा बरसा भाग व्यापून हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर लडाख पर्यंतपोहोचला
पुढील 24 तासात बिहार छत्तीसगडचा उर्वरित भाग दिल्ली गुजरात राजस्थान पंजाब या भागात पाऊस पोहोचणार आहे.
मोसमी वारे पुढे सरकण्यास अनुकूल स्थिती मोसमी वाऱ्यांच्या पुढील वाटचालीसाठी पोषक वातावरण तयार झाले
असून त्यामध्ये उत्तर पूर्व बंगालचा उपसागर ते ओडिसा तसेच पश्चिम बंगाल पर्यंत चक्रीय स्थिती कार्यरत आहे.
या चक्रीय स्थितीचे 24 तासातकमी दाबाचा पट्ट्यात रूपांतर होणार.
याचबरोबर उत्तर पूर्व अरबी समुद्रते गुजरातच्या किनारपट्टीपर्यंत
चक्रीय स्थिती आहे या दोन्ही स्थितीमुळे मोसमी वारे पुढे सरकण्यास अनुकूल स्थिती निर्माण होत आहे .बंगालच्या उपसागरात
ओडिसा पश्चिम बंगालपर्यंत चक्रीय स्थिती तसेच अरबी समुद्रात गुजरातच्या किनारपट्टीपर्यंत हवेच्या वरच्या भागात चक्रीय स्थिती
तयार झाली आहे. या दोन्ही स्थितीमुळे मानसून ने शनिवारी अलिबाग कोल्हापूर नागपूर पर्यंत धडक मारली येत्या 24 तासात
पुणे मुंबई उर्वरित महाराष्ट्र व्यापणार आहे तसेच 28 जून पर्यंत राज्यात चांगला पाऊस बरसणार आहे .
अनुपम कश्यपी हवामान शास्त्रज्ञभारतीय हवामानशास्त्र पुणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *