Maharashtra Politics

Maharashtra Politics :पंढरपूरचे राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके हे आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह मंगळवारी
(ता. २७) तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत बीआरएस या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. पंढरपूर येथे
रविवारी भालके गटाच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये भालके यांनी आपण असंख्य कार्यकर्त्यांसह
येत्या २७ जून रोजी बीआरएस पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले.Maharashtra Politics यामुळे पंढरपूर व
मंगळवेढा तालुक्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.तर स्व. भारत नानांच्या जाण्याने आमच्या कुटुंबाचे व मतदारसंघाचे
छत्र हरपले होते. अशा परिस्थितीत राजकीय पोरकेपणा दूर करण्यासाठी राजकीय सावली द्यायची सोडून पक्षाने वेगळी दिशा
दाखवण्याचे काम केल्यामुळे स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी पक्ष बदलाचा निर्णय तुमच्या बरोबरीने घेत आहे, असं भगीरथ
भालके यांनी म्हंटलं आहे

Maharashtra Politics

Maharashtra Politics: राष्ट्रवादीला अखेर खिंडार पडलं!

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर भगीरथ भालके हे राष्ट्रवादीमध्ये
नाराज होते. त्यातूनच त्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. भगीरथ भालके यांच्या बीआरएस
प्रवेशामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. कारण, त्यांनी पोटनिवडणुकीत एक लाखापेक्षा अधिक मते घेतली आहेत.
त्यामुळे भालके यांच्या पक्ष सोडण्याचे परिणाम पंढरपुरात आगामी निवडणुकीत दिसण्याची शक्यता आहे.मागील
काही दिवसांपासून भगीरथ भालके हे बीआरएस पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती.
तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी त्यांच्यासाठी खास विमान पाठविले होते. त्या विमानाने जाऊन
भालके यांनी सहकुटुंब केसीआर यांची हैदराबाद येथे भेट घेतली होती. त्यानंतर भालके यांच्या बीआरएसमध्ये जाण्याची शक्यता
बळावली होती. आज भालके यांनी अधिकृत बीआरएस पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. त्यांच्या निर्णयाचे
पंढरपूर व मंगळवेढा येथील कार्यकर्त्यांनी स्वागत केले.तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे आपल्या
मंत्रिमंडळासह आषाढी एकादशीच्या निमित्ताने २७ जून रोजी पंढरपूरला येणार आहेत. यादरम्यान सकाळी ११ वाजता सरकोली येथे
शेतकरी मेळावा होणार आहे. या मेळाव्यात भालके आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह बीआरएसमध्ये प्रवेश करणार आहेत.
शेतकरी मेळाव्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे आपल्या मंत्रिमंडळासह
आषाढी एकादशीच्या निमित्ताने २७ जून रोजी पंढरपूरला येणार आहेत. यादरम्यान सकाळी ११ वाजता सरकोली येथे
शेतकरी मेळावा होणार आहे. या मेळाव्यात भालके आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह बीआरएसमध्ये प्रवेश करणार आहेत.
शेतकरी मेळाव्याची जोरदार तयारी सुरू केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *