Biperjoy Cyclone Insurance Claime : देशाच्या पश्चिम किनारपट्टीला धडकलेल्या चक्रीवादळामुळे सर्वत्र मोठ्या प्रमाणात
नुकसान झाले आहे .महामंडळाने एलआयसी लोकांसाठी विमा दाव्याचे नियम सोपे केले आहेत.
नवी दिल्ली :चक्रीवादळात पीडितांसाठी विमा दावे करण्याचे नियम सोपे केले .गुजरातच्या किनारपट्टीवर धडकलेल्या या चक्रीवादळामुळे राज्यात मोठा विध्वंस झाला आहे.

त्याच वेळी त्याचा परिणाम महाराष्ट्र आणि राजस्थान पर्यंत दिसून येतो. अशा या परिस्थितीत एलआयसी ने उचललेल्या या
पावलाचा फायदा मोठ्या लोकसंख्येवर होणार आहे. अरबी समुद्रात तयार झालेले हे वादळ 15 जूनला गुजरातच्या किनारपट्टी
भागावर धडकले. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये लोकांच्या मालमत्तेचे आणि पायाभूत सुविधांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले
आहे. विमा नियामक आय आर डी ए आय ने बीपर जॉय चक्रीवादळाचा फटका बसलेल्या लोकांना मोठा दिलासा दिला. विमा
कंपन्यांना वादळाचा फटका बसलेल्या राज्यांमध्ये दावे लवकरात लवकर निकाली काढण्याचे आदेश दिले आहेत. भारतीय विमा
नियामक आणि विकास प्राधिकरणाने सर्वसामान्य विमा कंपनी आणि आरोग्य विमा कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना
उद्देशून दिलेल्या एका परिपत्रकात असे म्हटले आहे की सर्वदाव्यांची तात्काळ पाहणी करण्यात यावी आणि या दाव्यांची देयके
लवकरात लवकर भरण्यात यावी. आय आर डी ए ने म्हंटले ,विमा कंपन्या पॉलिसीधारकास दावे करताना आणि सर्व संबंधित
कागदपत्रे दाखल करताना पत्रव्यवहारासाठी इलेक्ट्रॉनिक संप्रेषणाचा जास्तीत जास्त वापर करण्यास प्रोत्साहित करतील
दाव्याच्या मूल्यांकनासाठी शक्य तितक्या डिजिटल प्रिक्रीयेचा वापर केला जाईल, याची खात्री करण्यासाठी प्रयत्न केले जातील. Biperjoy चक्रीवादळामुळे खूप राज्यांमधील मालमत्ता घरे आणि व्यवसाय यासह बहुतेक पायाभूत सुविधांचे खूप मोठ्या
प्रमाणात नुकसान झाल्याची शक्यता आहे. नियामकाने विमा कंपन्यांना त्वरित सेवा प्रति सुनिश्चित करण्यासाठी सर्व संसाधने एकत्रित करण्यास सांगितलेआहे.

Biperjoy Cyclone


विशेष काउंटर. चक्रीवादळानंतर तेथील बाधित लोकांच्या दाव्यांचा जलद निपटारा करण्यासाठी तपासक सर्वेक्षक आणि
नुकसान समायोजन करणाऱ्यांच्या सेवांचा यात समावेश आहे. परिपत्रकात असे म्हटले आहे की सर्व विमा कंपन्या दावेदारांना
त्यांच्या 24/7हेल्पलाइन द्वारे जिल्हास्तरावर विशेष क्लेम काउंटर द्वारे त्वरित प्रक्रिया करण्यासाठी आणि त्यांचा दावा सेटलमेंट
टीम सह डाव्यांच्या निपटारा द्वारे मदत करतील. पोर्टलवर स्वतंत्रपणे लिंक तयार.. एलआयसी ने बीपर जॉय चक्रीवादळातील
पिढीताना मदत करण्यासाठी त्यांच्या स्वतःच्या पोर्टलवर एक वेगळी लिंक देखील सुरू केली आहे. तेथे भेट देऊन लोक त्यांच्या
क्लेम सेटलमेंट साठी ऑनलाईन अर्ज भरू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *