Marathi News : छत्रपती संभाजी नगर न्यूज: कोल्हापुरात औरंगजेबाचा संदर्भ देऊन सोशल मीडियावर आक्षेपार व पोस्ट केल्याने
कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. कारवाईसाठी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यासमोर कार्यकर्ते जमले होते.
आक्षेपह पोस्ट करणाऱ्यांना तातडीने अटक करण्याची मागणी होते. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला
होता. दरम्यान रस्त्यावर उतरलेल्या संघटनांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने कोल्हापूर मध्ये सध्या तणावाचे वातावरण
पाहायला मिळत आहे . त्यामुळे कोल्हापूर मधील हिंसाचाराची परिस्थिती पाहता छत्रपती संभाजी नगर औरंगाबाद मध्ये पोलीस
अलर्ट देण्यात आला आहे. तर जिल्ह्याभरातील सर्वच पोलीस ठाणे प्रमुखांना पेट्रोलिंग वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या
सोबतच सोशल मीडियावर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना देखील वरिष्ठांकडून देण्यात आलेल्या आहेत.

कोल्हापूर शहरामध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर या घटनेचे पडसाद सर्व जिल्ह्यात उंटू नयेत याची खबरदारी छत्रपती
संभाजीनगर ग्रामीण पोलिसांकडून घेण्यात येते आहे. या दरम्यान या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया
यांनी सर्वच ठाणे प्रमुखांना ग्रुप कॉलिंग वर विशेष सूचना दिल्या तसेच सर्व जिल्ह्यात सर्वत्र पेट्रोलिंग वाढवण्याच्या सूचनात देखील दिल्या आहेत.

तर आपापल्या पोलीस ठाणे हद्दीत विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत .सोबत सोशल मीडियावर विशेष लक्ष
ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत .कोल्हापूर शहरात घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर सर्वांनाच अलर्ट राहण्याचा सूचना
देखील कलवानिया यांनी दिल्या. कोल्हापूर मध्ये नेमकं आज काय घडलं? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काही विशिष्ट समाजातील
तरुणांनी औरंगजेब आणि टिपू सुलतानाचे स्टेटस सोशल मीडियावर ठेवले होते. त्यामुळे यावरून हिंदुत्ववादी संघटनेचे काही
कार्यकर्ते पोलीस ठाण्याच्या समोर जमा झाले होते. तसेच आरोपींना अटक करण्याची मागणी त्यांनी केली .दरम्यान यावेळी
एका गटाने एका विशिष्ट समाजाच्या वस्तीवर दगडफेक केली .त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते तर आज पुन्हा
हिंदुत्ववादी संघटनांनी बंदची हाक दिली आहे.

दरम्यान यावेळी मोठा जमाव जमा झाला तसेच काही वेगवेगळ्या भागात दगडफेक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे
पोलिसांनी लाठी चार्ज करत जमा उपगवला तसेच अश्रू धुराच्या नळकांड्या ही फोडल्या होत्या. इंटरनेट बंद करण्याच्याहालचाली सुरू

Marathi News

कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर कोल्हापूर शहरात सध्याचे तणावपूर्ण वातावरण तयार झाले आहे. तसेच
जिल्हाधिकारी यांच्यासोबत पोलिसांची बैठक होणार असून यामध्ये शहरातील इंटरनेट सेवाबंद करण्याचा निर्णय घेतला
जाण्याची शक्यता आहे. सध्या कोल्हापूर शहरांमध्ये अनेक अफवा पसरवल्या जात आहेत . तसेच काही व्हिडिओ देखील
व्हायरल होत आहेत. त्यामुळे ही सर्व रोखण्यासाठी शहरांमधील इंटरनेट सेवा बंद करण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *