Pune Crime
Update : एमपीएससी परीक्षेत राज्यात तिसरी, मित्रासोबत गेल्यानंतर भयंकर घटना काय झाले.
Pune rime
:स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी मृतदेह सदर ठिकाणाहून बाहेर काढला. मृतदेहा जवळ चप्पल व मोबाईल आढळले असून
त्यावरून तक्रारदार वडिलांनी मृतदेहाची ओळख पटवली .
हायलाइट्स 1]एमपीएससी परीक्षेत राज्यात तिसरा क्रमांक
2]मात्र तरुणी सोबत नंतर धक्कादायक घटना
3]सतीचा माळ परिसरा कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह .

पुणे /भोर : राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी )स्पर्धा परीक्षेत राज्यात तिसरा क्रमांक पटकावित वनपरिक्षेत्र अधिकारी
पदाला गवसणी घालणाऱ्या आर एफ ओ 26 वर्षीय तरुणीचा वेल्हे तालुक्यातील राजगड किल्ल्यावर सतीचा माळ परिसरात
कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळलेला आहे .दर्शना दत्तात्रय पवार (वय 26 )राहणार कोपरगाव असे मृत तरुणीचे नाव आहे.
या प्रकरणी वेल्हे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे .याप्रकरणी तरुणीचे वडील दत्तात्रय दिनकर पवार
(वय47 )यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजगड किल्ल्यावर रविवारी सकाळी गुराख्याला एक
सडलेला मृतदेह दिसला. गुंजवणे गावचे पोलीस पाटील बाळकृष्ण रसाळ यांनी पोलीस ठाण्याला माहिती दिली .त्यानुसार
सहायक निरीक्षक मनोज पवार हवालदार औदुंबर अडवाल ज्ञानदीप धीवर योगेश जाधव हे घटनास्थळी पोहोचले .स्थानिकांच्या
मदतीने पोलिसांनी मृत तरुणीचा मृतदेह बाहेर काढला. मृतदेहाजवळ मोबाईल व चप्पल आढळून आली .त्यावरून तक्रारदार
वडिलांनी मृतदेहाची ओळख पटवून त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयामध्ये पाठवला.
एमपीएससी परीक्षेत यश संपादित केल्यामुळे एका खाजगी संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये दर्शनाचा सत्कार
करण्यात येणार होता. हा कार्यक्रम दहा तारखेला टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूल मधील गणेश सभागृहात झाला .मात्र या
कार्यक्रमाच्या नंतर तिचा फोन लागला नाही असे तिच्या पालकांचे म्हणणे आहे .पालकांनी 12 जूनला संबंधित संस्थेत विचारपूस
केली असता कार्यक्रमानंतर दर्शनात येथून गेल्याचे सांगितले .त्यामुळे तिच्या वडिलांनी 12 जूनला सिंहगड रोड पोलीस ठाण्यात
मुलगी हरवल्याची तक्रार नोंद केली . मित्र देखील गायब. तरुणीच्या पालकांनी तिच्या मित्र परिवारात चौकशी केल्यावर ती
राहुल दत्तात्रय हंडोरे यांच्याबरोबर सिंहगड आणि राजगड किल्ला पाहण्यासाठी जाणार होती ,असे समजले या सर्व प्रकारानंतर
राहुल हंडोरे हा देखील गायब आहे. तरुणीच्या मृतदेहा जवळचे तरुणाचे जर्किंग सापडले आहे .मात्र तिचा मित्र अद्याप घरी
आला नसून नातेवाईक त्याचा शोध घेत आहेत.

Pune Crime Update

यामुळे हा घातपात आहे की अजून काही याचा वेल्हे पोलीस तपास करीत
आहेत. मृतदेहाची ओळख पटली आहे .ती तरुणी कोणाबरोबर तिकडे गेली होती .तिने काय सांगितले होते. हे कुटुंबीयांकडून
जाणून घेऊन पुढील तपासाची दिशा ठरेल सध्या तिचे कुटुंबीय मानसिक धक्क्यामध्ये आहेत.
नितेश घटे अतिरिक्त पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *