ST Mahamandal Yojana

75 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना एसटी बसचा प्रवास मोफत: महाराष्ट्र शासनाचा महत्वपूर्ण निर्णयमहाराष्ट्र
शासन वेळोवेळी राज्यातील नागरिकांच्या कल्याणासाठी विविध आणि अनेक प्रकारच्या योजनांची अंमलबजावणी
करत असते, या योजनांच्या माध्यमातून सरकार लोकांच्या उन्नतीसाठी त्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करत असते,
यावेळी माननीय मुख्यमंत्री यांनी स्वतंत्र्याच्या अमृत मोहत्सावानिमित्त हि घोषणा केली, महाराष्ट्र राज्यात नव्याने
स्थापन झालेल्या सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील नागरिकांसाठी काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात
आले. त्यावेळी जेष्ठ नागरिकांसाठी हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. हा महत्वपूर्ण निर्णय म्हणजे राज्यातील
ज्या जेष्ठ नागरिकांनी वयाचे 75 वर्ष पूर्ण केले आहे अशा जेष्ठ नागरिकांना यानंतर एसटी बसच्या प्रवासाठी
पैसे खर्च करावे लागणार नाही, कारण महाराष्ट्र शासनाने त्यांच्यासाठी आतां एसटी प्रवास मोफत केला आहे

 • महाराष्ट्र सरकारने जेष्ठ नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे त्यामुळे राज्यातील जेष्ठ नागरिकां मध्ये
  आनंदाचे वातावरण आहे, महाराष्ट्र राज्यात या अगोदर जेष्ठ नागरिकांना प्रवासात पन्नास टक्के सूट दिली जात
  होती, परंतु आता शासनाच्या नियमानुसार वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना मोफत प्रवासाची सवलत
  देण्यात आली आहे. या सबंधित निर्णयाची योग्य रीतीने अंमलबजावणी करण्यासाठी एसटी महामंडळाचे
  उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री शेखर चन्ने यांच्या माध्यमातून निर्देश देण्यात आले आहे
 • शासनच्या या निर्णयाची अंमलबजावणी शुक्रवार पासून सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील
  75 वर्षे वयाच्या जेष्ठ नागरिकांना एसटी बसमधून विनामुल्य प्रवास शासनाच्या या योजनेचा फायदा
  जवळपास राज्यातील पंधरा लाख जेष्ठ नागरिकांना मिळणार आहे, एसटी महामंडळाच्या शिवनेरी या एसटी
  सेवें सह सर्व प्रकारच्या एसटी सेवांसाठी हि जेष्ठ नागरिकांची मोफत प्रवास योजना लागू असेल हि माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
 • जेष्ठ नागरिकांसाठी असलेली मोफत एसटी बस प्रवास योजनेची काही वैशिष्ठे
 • महाराष्ट्र राज्यातील शासना कडून राज्यातील जनतेसाठी विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते
  आणि त्या योजनांचा सर्व पात्र नागरिकांना लाभ मिळावा म्हणून सरकार नेहमी प्रयत्नशील असते,
  सर्वसामन्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासनाने पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केलेल्या राज्यातील वयोवृध्द
  नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवा निमित्त हि मोफत प्रवास योजना सुरु केली आहे,
  तसेच हि जेष्ठ नागरिकांसाठी असलेली मोफत प्रवास योजना राज्यातील तळागाळातील नागरीकांपर्यंत
  पोहोचविण्यासाठी प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहे.
 • राज्यातील ७५ वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास योजनेच्या प्रमाणपत्रांचे वितरण
  आज करण्यात आले. देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना
  एसटी बसमधून मोफत प्रवास योजनेचा लाभ राज्यातील सुमारे १५ लाख ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे. pic.twitter.com/seJXrfOQ4gया योजनेच्या संदर्भात अधिक माहिती म्हणजे हि योजनेच
  शुभारंभ 26 ऑगस्टला झाला आहे, त्यामुळे ज्या नागरिकांनी 26 ऑगस्ट 2022 पूर्वी एसटी मध्य प्रवासासाठी
  आरक्षण केले असेल आणि 26 ऑगस्ट पासून एसटी प्रवास करण्याऱ्या राज्यातील नागरिकांना तिकिटाचा
  परतावा शासनाच्या निर्णया प्रमाणे दिला जाणार आहे, या संदर्भातील माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष
  आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली आहे. राज्यातील पंच्याहत्तर वर्षे पूर्ण
 • केलेल्या नागरिकांसाठी एसटी प्रवास मोफत योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे
  आणि उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिमंडळच्या अधिवेशना दरम्यान करण्यात
  आला,
  या योजनेचे नाव ”अमृत जेष्ठ नागरिक”असे ठरविण्यात आले आहे, या योजनेचा शुभारंभ झाल्यावर एसटी महामंडळा कडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

  ST Mahamandal Yojana

  अमृत जेष्ठ नागरिक योजनेला लागणारी कागदपत्रे
 • महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली राज्यातील वरिष्ठ नागरिकांसाठी असलेली एसटी बस मोफत प्रवास
  योजनेला सुरुवात झाली आहे, त्यामुळे या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी राज्याच्या वरिष्ठ नागरिकांना
  प्रवासाच्या दरम्यान काही कागदपत्रांची आवश्यकता पडेल, वरिष्ठ नागरिकांना प्रवासा दरम्यान आधार कार्ड,
  पॅनकार्ड किंवा वाहन परवाना किंवा निवडणूक ओळख पत्र व शासनाने प्रमाणित केलेले ओळखपत्र यापैकी कोणतेही ओळखपत्र एसटी…
  Disclaimr : प्रिय वाचक मित्रहो, या वेबसाईटचा राज्य सरकार, केंद्र सरकार किंवा इतर कोणत्याही
  सरकारी संस्थेशी कोणताही सबंध नाही, या वेबसाईटवर प्रदान केलेली संपूर्ण माहिती आमच्याव्दारे,
  अधिकृत वेबसाइट्स आणि विविध संबंधित योजनांच्या अधिकृत माहिती पत्रकांच्या माध्यमातून आणि अनेक
  अधिकृत स्त्रोतांच्या माध्यमातून गोळा केली जाते, या माहितीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला नेहमीच केवळ
  प्रामाणिक माहिती आणि सुचना देण्याचा प्रयत्न करतो. या वेबसाईटवर तुम्हाला नेहमी अद्यावत बातम्या आणि
  राज्य व केंद्र सरकारच्या योजनांच्या संबंधित प्रमाणिक माहिती मिळेल, तरी वाचक मित्रहो, आम्ही तुम्हाला
  सुचवितो कि, कोणत्याही योजनेच्या संबंधित अंतिम निर्णय घेण्यापूर्वी माहिती पडताळणीसाठी संबंधित योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

Balasaheb Thackeray’s son?’:भाजपने उद्धव ठाकरेंच्या गोध्रा टीकेवर टीका केली.
Nitin Gadkari:नितीन गडकरी डिझेल वाहनांच्या विक्रीवर 10% अतिरिक्त जीएसटी.

10 thought on “ST Mahamandal Yojana : 75 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना एसटी बसचा प्रवास मोफत”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *