Ashadhi Wari 2023: वारकरी आपापल्या गावातून निघून पायी दिंडी सोबत पांडुरंगाच्या दर्शनाला जात असतात. 20 ते 22 दिवस चालल्यानंतर पांडुरंग आपल्याला दिसेल.Ashadhi Wari 2023 आपण त्याचे चरण स्पर्श करू या, आशेवर ते वारकरी चालत असतात ,ना कुटुंबाची, काळजी ,ना शेतीची, जनावरांची, ना कामाची इतर वेळी बाहेर कुठेही मुक्कामास न थांबणारे शेतकरी, मजूर ,काबाडकष्ट करणारे लोक वारीला मात्र हमखास गर्दी करतात .विठ्ठल पंढरीत नसतोच. मुळी तो इथेच आमच्या सोबत चालतो. वारकऱ्यांच्या भेटीला साक्षात पांडुरंग येतो .तो आमची सेवा करतो असे. अनुभव वारकरी लोक सांगतात पंढरीच्या पायी दिंडीला दोन प्रमुख दिंड्या निघतात. आषाढी वारी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधीने पावन झालेल्या या भूमीचे वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्त्व आहे.
Sant Dnyaneshwar माऊलींच्या समाधी बरोबरच येथे असणारे विविध मंदिरे मठ यामुळे या तीर्थस्थानाला एक वेगळेच पवित्र लाभले आहे .ज्ञानेश्वरांची समाधी हे आळंदीतील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. वारकरी संप्रदायात अनेक संत होऊन गेले आहेत .सर्वसाधारणपणे नात संप्रदाय म्हणून ओळखले जाणारे संत एकनाथ महाराज होय. संत एकनाथ महाराज हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे एक संत त्यांचा जन्म इसवी सन पंधराशे तेहतीस मध्ये पैठण येथे झाला. संत भानुदास हे एकनाथ महाराजांचे पंजोबा ते सूर्य देवाची उपासना करी. पंढरीची वारी श्री संत एकनाथांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण होते. आईचे नाव रुक्मिणी होते. आई-वडिलांचा सहवास त्यांना फार काळ लाभला नाही. त्यांच्या आजोबांनी त्यांना सांभाळले .संत एकनाथ यांच्या आयुष्यात अनेक असे दैवी प्रसंग घडले होते .त्यातील एक म्हणजे संत एकनाथ महाराजांनी संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी शोधून ती पुन्हा उघडून ज्ञानेश्वर माऊलींची भेट घेतली होती. संत एकनाथ महाराजांना स्वप्नात दृष्टांत झाला होता. या संपूर्ण घटनेवर महाराजांनी अभंगाची रचना ही केली आहे. संत ज्ञानेश्वरांनी घेतलेली संजीवन समाधी नेमकी कशी आहे. ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी मध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली ही प्राचीन भारतातील अष्टांग योगामध्ये प्रचलित केलेली योगदान असतं .खोल ध्यानस्थ अवस्थेत प्रवेश केल्यानंतर स्वच्छेने नश्वर शरीर सोडण्याची प्रथा होती. संजीवन समाधीची तयारी नामदेवांच्या मुलांनी केली. संजीवन समाधी बद्दल ज्ञानेश्वरांनी स्वतः उच्च जागरूकता आणि विविध चुंबकीय किरणोत्सवर्गाचा रूपात प्रकाश किंवा शुद्ध ऊर्जा यांच्यातील संबंधांबद्दल जोरदारपणे सांगितले आहे.
हिंदू कॅलेंडरच्या कार्तिक महिन्याच्या कृष्णा पक्षाच्या तेराव्या दिवशी आळंदी येथे ज्ञानेश्वर महाराजांनी तेव्हा 21 वर्षाचे असताना संजीवन समाधीत प्रवेश केला. त्यांची समाधी आळंदीतील सिद्धेश्वर मंदिर परिसरात आहे. त्यांच्या निधनाने नामदेव व इतर उपासितांनी शोक केला. अनेक वारकरी भक्तांचा असा विश्वास आहे की ज्ञानेश्वर महाराज हे अजूनही जिवंत आहेत. संजीवन समाधी म्हणजे जीवनपणी समाधी घेणे असे नाही तर सूर्य चंद्र आहेत. तोपर्यंत त्या ठिकाणी ब्रह्म भावाने स्थिर राहावे असा बोध आहे. एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीची संजीवक्ता त्यांच्या चरित्राच्या व वाङ्मयाच्या द्वारे स्पष्ट केली आहे. || दिव्य दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा || परब्रम्ह केवळ बोलत असे || 1 || अजानवृक्षाची मुळीकंठ आस लागली || येऊनि आळंदी स्थळी काढ वेगी || 2 ||असे स्वप्न होता आलो अलंकापुरी || जव नंदी माझारी || 3 || देखील द्वार एका जनार्दनी || पूर्व पुण्य फळले श्री गुरु भेटले ज्ञानेश्वर || 4 माऊलींच्या समाधीनंतर साधारण अडीशे वर्षांनी ज्यांचा अवतार झाला होता .मग संत ज्ञानेश्वर अन संत एकनाथ महाराजांची भेट कशी झाली याचे उत्तर आहे की असे शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात की, माऊलींनी मला स्वप्नात येऊन जा अजून वृक्षाच्या सानिध्यात मी समाधी घेतली आहे .त्या अजानवृक्षाची मुळी माझ्या कंठास लागली आहे. ती तू येऊन बाजूला कर , असा आदेशच संत ज्ञानेश्वरांनी एकनाथ महाराजांना दिला होता. हे कळतच गहिवरून गेलेले .एकनाथ महाराज आपल्याबरोबर काही जणांना घेऊन आळंदी कडे त्वरित रवाना झाले .यावेळी संत ज्ञानेश्वर माऊलींनी संत एकनाथांना आणखी एक महत्त्वाचा कार्य करायला दिलं ते म्हणजे ज्ञानेश्वरीच्या शुद्धीकरणाचं. त्याकाळी हस्तलिखित पोत्यात वापरत असल्याने एका पोथीवरून दुसरी प्रत लिहून काढताना होणाऱ्या चुका तर होत्याच पण काही माणसं अशा प्रती तयार करताना हेतू पुरस्कर त्यात स्वतःच्याही मोडक्या थोडक्यात ओव्या घुसळत असतात. हा स्वप्नदृष्टांत जेव्हा एकनाथांना झाला .तेव्हा संत एकनाथ महाराज अलंकापुरी आले आणि नंदी जवळची शिळा दूर करून ज्ञानेश्वर महाराजांची समाधी जिथे होती .तिथे गेले तेव्हा दिव्य तेजपुंज ब्रह्मरूप श्री गुरु ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन झाले. त्यांची भेट झाली पैठण यात तीर्थक्षेत्री नाथांच्या कीर्तनाला खूप मोठा जनसमुदाय लोटत असे.
पंढरपूर या क्षेत्री देखील त्यांची कीर्तने वारकरी पंथात खूपच लोकप्रिय होती. पैठणला परत आल्यावर नाथांनी ज्ञानेश्वरीच्या अनेक हस्तलिखित प्रति जमवल्या त्यांचा अभ्यास आणि संशोधन केले आणि शेवटी नितांत श्रद्धेने कष्टाने श्री ज्ञानेश्वरी ची निर्दोष प्रत तयार केली. ज्ञानेश्वरीच्या शुद्धीकरणानंतर एकनाथांनी तितक्याच तोला मोलाचे केलेलं दुसरे कार्य म्हणजे भावार्थरामायण या ग्रंथाची निर्मिती केली. Konark Sun Temple:वयोमानानुसार धडे शिकवणाऱ्या कोणार्क विद्यापीठात तुमच्या या गोष्टी लक्षात आल्या आहेत का!